क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिपळदरा येथे पेट्रोल संपल्याने रस्त्याकडेला लावलेली स्प्लेंडर मोटारसायकल चोरी; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


शिरूर, दि. ७ :चावडीराज न्युज नेटवर्क
शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा–न्हावरा रस्त्यावरील पिपळदरा परिसरात पेट्रोल संपल्याने रस्त्याच्या कडेला उभी केलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन संपत बरडे (वय २३, रा. सध्या न्हावरा, ता. शिरूर) हे २८ जून रोजी राहू येथून न्हावऱ्याकडे मोटारसायकलने येत होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आलेगाव पागा–न्हावरा रस्त्यावरील पिपळदरा येथे त्यांच्या मोटारसायकलचे पेट्रोल संपले. त्यांनी मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी करून न्हावरा येथून पेट्रोल आणण्यासाठी प्रस्थान केले.
सुमारे अर्ध्या तासाने ते परत आले असता मोटारसायकल जागेवर नव्हती. परिसरात शोध घेऊनही ती मिळून न आल्याने त्यांनी तक्रार दिली. चोरीस गेलेली मोटारसायकल हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-४२-एवाय-०१७०) असून तिची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस फौजदार भोते करीत आहेत.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *