क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

शिरूर बायपासवर पुन्हा एका उद्योजकाचा अपघाती मृत्यू; अज्ञात कारची जोरदार धडक विघ्नहर्ता हॉस्पिटलसमोरील घटना; धडक देणारे वाहन मदत न करता पसार


शिरूर : (प्रतिनिधी)
शिरूर बायपासवर अपघातांची मालिका सुरूच असून, आज दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सोमनाथ बोऱ्हाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बोऱ्हाडे हे आपल्या ज्युपिटर दुचाकीवरून जात असताना विघ्नहर्ता हॉस्पिटलसमोर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या ज्युपिटर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळी न थांबता तसेच जखमी व्यक्तीला कोणतीही मदत न करता पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शिरूर बायपासवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *