क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

भिसीच्या आमिषाने २० कोटींचा गंडा; कारेगावातील तिघे अटकेत


 

शिरूर : (प्रतिनिधी )
पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत ‘कारेश्वर भिसी मंडळा’च्या माध्यमातून ३९ नागरिकांकडून तब्बल २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी शिक्षक बारकु चंदर सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलभा शरद नवले, नितीन शरद नवले, सुहास शरद नवले, अश्विनी नितीन नवले व प्रतिक्षा सुहास नवले, सर्व रा. कारेगाव, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
आरोपींनी ‘कारेश्वर भिसी मंडळ’ नोंदणीकृत असल्याचे भासवून नागरिकांना भिसीत पैसे भरल्यास दामदुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर ऑनलाइन व रोख स्वरूपात ३९ जणांकडून एकूण २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सुलभा नवले, नितीन नवले व सुहास नवले यांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत.
दरम्यान, अशाच प्रकारे भिसीच्या नावाखाली आपली फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी आवश्यक पुराव्यांसह रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *