आरोग्यमहाराष्ट्रराजकीयशहर

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूरमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर


शिरूर, प्रतिनिधी :
दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उपक्रम मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत शिरूर नगरपरिषद, जुने मंगल कार्यालय, शिरूर बस स्टँडजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या शिबिराचे आयोजन बै. जी. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आयोजकांनी शिरूर शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *