क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

सोनेसांगवीजवळ अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू


शिरूर : (प्रतिनिधी )
सोनेसांगवी गावाजवळ अष्टविनायक महामार्गावर दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दीपक थोरात या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनेसांगवी गावाजवळ अष्टविनायक महामार्गावर दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार दीपक थोरात गंभीर जखमी झाले. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


अपघातानंतर रांजणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिकअप वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
दीपक थोरात यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *