क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

रामलिंग येथे घरफोडी; ४ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास


शिरूर :(प्रतिनिधी )
रामलिंग (ता. शिरूर) येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाट व तिजोरीचा कप्पा फोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८५ हजार ५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी गंगाधर रामचंद्र भोसले (वय ६९, रा. रामलिंग, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७७२/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(२), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान भोसले यांच्या रामलिंग येथील घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी-कोंडा अज्ञात चोरट्याने तोडला. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून त्यातील तिजोरीचा कप्पाही फोडण्यात आला.
चोरट्याने तिजोरीतील सोन्याचे विविध दागिने, चांदीच्या वस्तू आणि ३ हजार ६०० रुपये रोख असा एकूण ४ लाख ८५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
घटनेची नोंद २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक फौजदार भोते यांनी केली आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *