ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेसाठी पुणे जिल्ह्यातील १.०८ लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड


शिरूर तालुक्यातील ८,४५२ शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत, मृत वारस व आधार नसलेल्या खातेदारांनी तत्काळ नोंदणी करण्याचे आवाहन”

पुणे, ता. १ : चावडीराज न्युज पुणे शिरूर
राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’च्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) मोठे पाऊल उचलत जिल्ह्यातील एक लाख ८ हजार ३४१ थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केली आहे.


सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) कार्यालयाने योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकेला कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पीडीसीसी बँकेने सर्व पात्र कर्जदार खातेदारांची माहिती पोर्टलवर नोंदविली आहे.
मात्र, जिल्ह्यातील ११३ पात्र शेतकरी मृत असल्याने आणि त्यांच्या खात्यांमध्ये वारसनोंद झालेली नसल्यामुळे त्यांची माहिती अपलोड करता आलेली नाही. तसेच, २९ सभासदांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांचाही तपशील अद्याप पोर्टलवर नोंदविण्यात आलेला नाही.
तालुकानिहाय अपलोड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :
आंबेगाव – ३,३९०, बारामती – १३,७२८, भोर – ७,२४२, दौंड – १९,५६२, हवेली – ४,१६८, इंदापूर – १८,८१८, जुन्नर – ७,७७८, खेड – ७,८५३, मावळ – ५,१७२, मुळशी – २,३८७, पुरंदर – ७,९०३, शिरूर – ८,४५२, आणि वेल्हा – १,८८८. अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण एक लाख ८ हजार ३४१ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी मृत सभासदांच्या वारसांनी तातडीने वारसनोंद करून घ्यावी तसेच आधार क्रमांक उपलब्ध नसलेल्या सभासदांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन केले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची माहितीही पोर्टलवर अपलोड करून त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *