ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश


पुणे : चावडीराज न्युज नेटवर्क
भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी दि. ६ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार, संभाव्य अतिवृष्टी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दि. ६ जुलै रोजी सुट्टी राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तथापि, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले, धबधबे आणि पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच प्रशासन व भारतीय हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *