शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

शिरूर, दि. ३ : सुदर्शन दरेकर
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असताना संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे की नाही, या मुद्यावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

माजी आमदार यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये प्रशासक कालावधीत ग्रामपंचायत प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार देता येणार नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत प्रत अद्याप प्राप्त झालेली नसून, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतरच स्थगितीची नेमकी कारणे, न्यायालयाची निरीक्षणे आणि निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेबाबत स्पष्टता येणार आहे.
या निर्णयामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पुढील कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अधिकृत आदेशाची प्रत प्राप्त होताच सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

