ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्य माता गोमाता संवाद यात्रेचे शिरूरमध्ये भव्य स्वागत; गोसेवा आणि संवर्धनाचा संदेश!


चावडीराज न्यूज | शिरूर महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्य माता गोमाता संवाद यात्रेचे शिरूर शहरात उत्साहपूर्ण आणि भव्य स्वागत करण्यात आले. राज्यभर जनजागृती करत मार्गक्रमण करणाऱ्या या यात्रेचे शिरूरकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

  1. यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत गोसंवर्धन, गोसेवेचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेचे असलेले अनन्यसाधारण स्थान याविषयी माहिती दिली. तसेच शासनाच्या विविध गोसेवा योजनांची माहिती देत जनजागृती करण्यात आली.
    या स्वागत सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय गोमाता सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण भंडारी, तहसीलदार आकाश किसवे, शिरूरचे नगरसेवक व गौरक्षक उमेश शेळके, गोसेवा आयोगाचे पुणे जिल्हा संयोजक प्रतीक बनकर, जैन प्रकोष्ठ अल्पसंख्यांक अध्यक्ष नितीन भंडारी, गोसेवक लालासाहेब वाकचौरे, दीपक निकम तसेच पशुसंवर्धन विभागाचे दीपक कारखिले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    राज्यभर सुरू असलेल्या या संवाद यात्रेमुळे गोसंवर्धन आणि गोसेवा चळवळीला अधिक बळ मिळणार असून, समाजामध्ये गोमातेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *