क्राईममहाराष्ट्र

उसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने 12.67 लाखांची फसवणूक; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


शिरूर : चावडीराज न्युज नेटवर्क
शेतीसाठी उसतोड मजूर पुरवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 12 लाख 67 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील शेतकरी श्री. सुधीर शिवाजी जाधव (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेषराव गोपीनाथ जाधव, कार्तिक शेषराव जाधव आणि सुंदर उत्तमराव जाधव (सर्व रा. वंजारवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) यांनी सन 2025-26 च्या गाळप हंगामासाठी फिर्यादी यांना शेतीसाठी उसतोड मजूर पुरवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पराग अग्रो फूड्स अँड अलाइड प्रॉडक्ट्स प्रा. लि. साखर कारखान्याशी लेखी करार करून विश्वास संपादन केला.
या विश्वासातून आरोपींनी फिर्यादींकडून त्यांच्या बँक खात्यावर एकूण 12 लाख 67 हजार रुपये घेतले. मात्र, उसतोड मजूर उपलब्ध करून न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 596/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *