क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

पत्रकारांविरोधातील गलिच्छ वक्तव्य प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी


शिरूर, दि. 26 जून :सुदर्शन दरेकर

शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी आक्षेपार्ह व गलिच्छ भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शिरूर तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पत्रकार संघटनांच्या निवेदनानुसार, दि. 25 जून रोजी एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी संतापाच्या भरात पत्रकारांना अवमानकारक भाषा वापरून शिवीगाळ केली. तसेच कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेवेळी पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पत्रकार संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत, पत्रकारांना धमकावणे आणि त्यांच्याविषयी अश्लील व अवमानकारक भाषा वापरणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. संबंधित खासदारांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर, सतीश धुमाळ, प्रवीण गायकवाड, मुकुंद ढोबळे, अभिजित आंबेकर, सुनील जिते, सागर रोकडे, तेजस फडके, रुपाली खिल्लारी, निलेश काळे, अर्जुन शेळके, धर्मा मैड, सुदर्शन दरेकर,अमृता झांबरे, शैलेश जाधव,अविनाश घोगरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे आणि निलेश वाळुंज उपस्थित होते.

पत्रकार संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *