आरोग्यटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

दोन दिवसांच्या अथक शोधानंतर शेतकऱ्याचा मृतदेह हाती उरळगाव येथील घटना; आपत्ती व्यवस्थापन संघाच्या पथकाला यश


उरळगाव :प्रतिनिधी
विद्युत मोटारीची केबल जोडण्यासाठी गेलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी उरळगाव येथे घडली होती. घटनेची माहिती मिळताच लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या आदेशानुसार त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन संघाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.
गेल्या दोन दिवसांपासून नदीपात्रात सुरू असलेल्या शोधमोहिमेला अखेर मंगळवारी (ता. ११) यश आले. पाण्याचा वेगवान प्रवाह आणि नदीपात्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शोध घेताना पथकासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, जवानांनी विविध ठिकाणी अथक प्रयत्न करत शोधमोहीम सुरू ठेवली.
दोन दिवसांच्या सततच्या प्रयत्नांनंतर संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.


या घटनेमुळे उरळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, संकटाच्या काळात तातडीने घटनास्थळी पोहोचून दोन दिवस सातत्याने शोधमोहीम राबवून मृतदेह शोधून काढल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन संघाच्या पथकाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *