क्राईम

प्रेमसंबंधातून ३ वर्षीय चिमुकल्याचा खून; रांजणगाव पोलिसांनी आरोपीला केली अटक,शिरूरच्या करेगावमधील घटना


  • शिरूर : सुदर्शन दरेकर
    प्रेमसंबंधातून लग्न करण्याच्या वादातून एका ३ वर्षीय चिमुकल्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना कारेगाव (ता. शिरूर) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कारेगाव येथील कल्याणी कंपनी परिसरात वास्तव्यास असून तिचा तीन वर्षीय मुलगा अंशु याचा संशयित आरोपी देवांशु आदित्य साहू (रा. अनुपपूर, मध्यप्रदेश) याने खून केल्याचा आरोप आहे.
    दि. १७ जून २०२६ रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान कारेगाव येथील राहत्या खोलीत ही घटना घडली. फिर्यादी महिलेने आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून तसेच तिच्या मुलाला वडिलांकडे सोडण्याच्या कारणावरून आरोपीने चिमुकल्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने मुलाचा मृत्यू झाला.
    या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देवांशु आदित्य साहू याला पोलिसांनी अटक केली आहे.
    घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे करीत आहेत.

Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *