क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीच्या वेअरहाऊसमधून २.०८ लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल चोरी



रांजणगाव प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एलजी कंपनीच्या वेअरहाऊसमधून नागपूर येथील गोदामाकडे वाहतूक होत असलेल्या इलेक्ट्रॉनिक मालाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शरद तुकाराम पवार (वय ४२, रा. रांजणगाव, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै ते १३ जुलै २०२६ या कालावधीत एलजी कंपनीच्या वेअरहाऊसमधून नागपूरकडे निघालेल्या एनएल-०१-एए-०३९७ या ट्रकमधील सील (लॉक) तोडून अज्ञात चोरट्याने १३ एलईडी टीव्ही आणि २ मॉनिटर असा एकूण २ लाख ८ हजार ४२७ रुपयांचा माल चोरून नेला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५(सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार शिंदे करत आहेत.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *