क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

शिरूरमधील कुख्यात गुन्हेगारी टोळीवर मोक्का; ११ जणांवर कारवाई कर्डे घाट गोळीबार अन्य गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाई संदर्भात मोक्का अंतर्गत कारवाई!


शिरूर 🙁 प्रतिनिधी )
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर अग्नीशस्त्रांचा वापर करून गोळीबार, खून व खुनाचा प्रयत्न करत दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी या कारवाईस मंजुरी दिली आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात पूर्वीच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून टोळक्याने गोळीबार व दगडफेक करून विशाल सुनील काळे (वय ३१) याचा खून केल्याचा आरोप आहे. तसेच केदार झाडगे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून फिर्यादीच्या दिशेने गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्याचा तपास शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी संयुक्तपणे केला. तपासात इशप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, रा. वाघोली) हा टोळीप्रमुख असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह एकूण ११ जणांचा सहभाग तपासात समोर आला आहे. यापैकी १० आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत, तर गोपाळ संजय यादव हा आरोपी फरार आहे.
या टोळीविरुद्ध शिरूरसह पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, दरोडा, बेकायदेशीर जमाव तसेच अग्नीशस्त्रांचा वापर अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कामगिरी
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभाग, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले, शिरूर उपविभाग, व चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सासवड पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक विनोद पाटील, शिरूर पोलीस स्टेशन व स्था.गु.शा.चे पोसई सुधीर वाळुंज, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, स.फौ. शिवाजी निकम, पो.हवा. अक्षय यादव, महेश खरात, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, पो.शि. रहीस मुलाणी, सफौ. संजय पड्याळ, पो हवा. तुषार पंदारे, पो हवा. जनार्दन शेळके, पो हवा. संजू जाधव, पो हवा. राजु मोमीन, पो हवा. विकास पाटील व पो.शि. सागर धुमाळ व सासवड पोलीस स्टेशनचे पोसई परमेश्वर गोडसे, पो.शि. तुषार लोंढे व प्रविण शेंडे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *