ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलिसांचा रूट मार्च


शिरूर :(प्रतिनिधी )
ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी शिरूर पोलिसांकडून शहरातील मुख्य बाजारपेठ व संवेदनशील भागातून रूट मार्च काढण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. शिरूर पोलीस स्टेशनपासून सुरू झालेला रूट मार्च शनी मंदिर, सरदार पेठ, पाच कंदील चौक, डंबे नाला, शिरूर एसटी स्टँड या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला.
यावेळी पोलिसांनी शहरातील संवेदनशील ठिकाणांसह गर्दीच्या भागाची पाहणी केली. सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.ईद-ए-मिलादचा सण नागरिकांनी शांततेत, उत्साहात आणि आनंदाने साजरा करावा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *