ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां शोभनाताई पाचंगे यांचे दुःखद निधन सामाजिक जाणिवेचा एक तारा निखळला


शिरूर : सुदर्शन दरेकर
जिल्हा परिषद सदस्या, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तसेच दक्षता समितीच्या सदस्या म्हणून उल्लेखनीय कार्य केलेल्या शोभनाताई पाचंगे यांचे आकस्मिक निधन झाले.
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात त्यांनी शिरूर तहसील कार्यालयात हजेरी लावल्यानंतर त्या आपल्या घरी परतल्या परंतु संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
राजकारणात अल्पकाळ कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. दक्षता समितीच्या माध्यमातून समुपदेशन करत त्यांनी अनेक महिलांना न्याय मिळवून देण्यासह अनेक संसार उध्वस्त होण्यापासून वाचवले. पोलिस ठाण्यांच्या आवारात समितीसाठी उपलब्ध करून दिलेली जागा त्यांनी स्वखर्चाने सुस्थितीत करून घेतली होती. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पोलिस प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला होता.
अनेक राजकीय नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कुटुंबातील मुले, सुना व नातवंडांवर त्यांचे विशेष प्रेम होते.


विशेष म्हणजे, निधनाच्या दिवशी सकाळी त्यांनी तहसील कार्यालयातील स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. मात्र, संध्याकाळी त्यांच्या निधनाची वार्ता समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
त्यांच्या निधनाने सामाजिक जाणिवेने कार्य करणारे एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *