क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कामगिरी! 3.75 लाखांचे 15 गहाळ मोबाईल शोधून मालकांच्या स्वाधीन


रांजणगाव, दि. 4 :सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज )
गहाळ झालेला मोबाईल पुन्हा मिळण्याची आशा बहुतांश नागरिक सोडून देतात. मात्र, रांजणगाव MIDC पोलिसांनी तब्बल 3 लाख 75 हजार रुपये किमतीचे 15 गहाळ मोबाईल शोधून त्यांचे मूळ मालकांना परत करत नागरिकांना आनंदाचा धक्का दिला आहे.
रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव, रांजणगाव परिसर तसेच आठवडे बाजार आणि प्रवासादरम्यान मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याच्या सूचना दिल्यानंतर तपास पथकाने यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.
पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी तांत्रिक विश्लेषण आणि ट्रेसिंगच्या माध्यमातून सन 2025 पासून आजपर्यंत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध सुरू ठेवला होता. या अथक प्रयत्नांना यश मिळत 15 मोबाईल हस्तगत करण्यात आले.
शोधून काढण्यात आलेले सर्व मोबाईल शनिवारी (दि. 4 जुलै) पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. अनेक नागरिकांनी गहाळ मोबाईल परत मिळाल्याने रांजणगाव MIDC पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ही पोलीस स्टेशनकडून मिळालेली ‘सरप्राईज गिफ्ट’ असल्याची भावना व्यक्त केली.
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी पार पाडली.
दरम्यान, आणखी काही गहाळ मोबाईलचे ट्रेसिंग सुरू असून त्यांचाही लवकरच शोध लावला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *