आरोग्यक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिरूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरवर गुन्हा दाखल, रुग्णालयातील रुग्णांच्या गैरसोयीबद्दल नगरसेवक आक्रमक!


शिरूर, दि. २९ : चावडीराज न्युज नेटवर्क
शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका सेवेसाठी ड्युटीवर असताना मद्यप्राशन करून गोंधळ घालणे तसेच जखमी रुग्णाला मदत न केल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विलास आनंदराव कांदळकर (वय ५८, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिनांक २७ जून २०२६ रोजी नगरसेवक सुनील जाधव आणि एजाज बागवान सागर नरवडे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन, उपजिल्हा रुग्णालय शिरूर येथे १०८ सेवेसाठी बिव्हीजी कंपनीच्या सेवेत कार्यरत असलेले डॉ. कांदळकर हे ड्युटीवर असताना मद्यधुंद अवस्थेत असून रुग्णालय परिसरात गोंधळ घालत आहेत तसेच जखमी रुग्णाला मदत करत नसल्याची तक्रार केली होती.
त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस अंमलदार संदिप अशोक खेडकर यांनी फिर्याद दिली असून, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *