शिरूरमध्ये युवकाला अडवून पाच जणांकडून मारहाण; नोकरीवरून काढल्याचा राग, एकासह चार अनोळखींच्या विरोधात गुन्हा दाखल
शिरूर,चावडीराज न्युज नेटवर्क
शिरूर शहरातील वात्सल्य हॉस्पिटलसमोर एका युवकाला अडवून पाच जणांनी मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एका नामनिर्देशित आरोपीसह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीषकुमार जयप्रकाश सिंग (वय 26) हे 17 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना शशिकांत गायकवाड (रा. शिक्रापूर) व त्याच्यासोबत असलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडविले. “तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले,” असा आरोप करत संबंधितांनी संगनमताने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ व दमदाटी करत गर्दीपासून दूर नेऊन मारहाण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 571/2026 अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

संपादक : सुदर्शन दरेकर

