महाराष्ट्रराजकीयशहर

बाल संस्कार वर्गातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मा.आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस साजरा


शिरूर :(प्रतिनिधी )
शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  स्वप्नाली योगेश जामदार (नगरसेविका) मित्र परिवाराच्या वतीने आयोजित बाल संस्कार वर्गात विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बाल संस्कार वर्गातील मुलांना  शीतल शर्मा व गीताराणी आढाव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुलांनी विश्वप्रार्थना सादर करून अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांनी अशोक पवार यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक करत नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची त्यांची हातोटी असल्याचे सांगितले.

सभापती डॉ. सुनीता पोटे यांनी अशोक पवार यांच्या कार्यकाळात शिरूर शहर व तालुक्याच्या विकासाला चालना मिळाल्याचे सांगितले. नगरसेविका स्वप्नाली जामदार यांनी अशोक पवार व प्रकाशभाऊ यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी झालेल्या कामांचा उल्लेख करून अशोक पवार यांनी पुन्हा आमदार म्हणून तालुक्याचे नेतृत्व करावे, अशी सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे सांगितले. रविंद्र खांडरे यांनी अशोक पवार यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतींची माहिती दिली.

यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, सभापती डॉ. सुनीता पोटे, नगरसेविका स्वप्नाली जामदार, डॉ. वैशाली साखरे, शीतल पोटे, विजय शेजवळ, रविंद्र खांडरे, विशाल जोगदंड, योगेश जामदार, गीताराणी आढाव, राजकुमार स्वामी व गणेश शेजवळ उपस्थित होते.

बाल संस्कार वर्गातील मुलांना नितीन जामदार यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली साखरे यांनी केले, तर आभार स्वप्नाली जामदार यांनी मानले.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *