क्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिक्षक पात्रता परीक्षेवर पेपरफुटीचे सावट, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय


चावडीराज न्युज नेटवर्क :सुदर्शन दरेकर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. 28 जून 2026 रोजी संपूर्ण राज्यातील 1,028 परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 आयोजित करण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीच्या संशयामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे भिवंडी येथे काही इसमांकडे TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली.

यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित इसमांकडे असलेले काही प्रश्न TET जून 2026 च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी मिळते-जुळते असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दि. 28 जून 2026 रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे.

परीक्षेच्या नवीन तारखेबाबत आणि इतर अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *