आरोग्यमहाराष्ट्रशहरशिक्षण-प्रशिक्षण

शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योग शिबिरातून विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा संदेश


शिरूर : चावडीराज न्युज नेटवर्क
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिरूर येथील विद्याधाम प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. योगाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास साधता येतो, असा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सामूहिक योग साधना करून योग दिन साजरा केला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन वनवे आणि उपप्राचार्य दिगंबर नाईक यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत नियमित योगाभ्यासामुळे आरोग्य सुदृढ राहते तसेच मन एकाग्र होण्यास मदत होते, असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक चंद्रकांत देविकर, मच्छिंद्र बनकर, हरिभाऊ भुसारे, क्रीडा विभाग प्रमुख सचिन रासकर, एनसीसी विभाग प्रमुख संतोषकुमार देंडगे, सुभाष गायकवाड, हरी पवार, पूनम पवार, कल्पना भोगवडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसमवेत योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.


कार्यक्रमादरम्यान विवेकानंद क्षीरसागर यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी योग गीताने वातावरण अधिक उत्साही झाले. योगाच्या विविध प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या योग शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *