आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिरूर नगरपालिकेतर्फे सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन
शिरूर,:-चावडीराज न्युज नेटवर्क

दि. २१ जून २०२६: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिरूर नगरपरिषदेच्या वतीने रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिरूर शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.
योग हा निरोगी आणि सुदृढ जीवनाचा पाया मानला जातो. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैली जोपासण्यास मदत होते. याच उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शिरूर नगरपरिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या कार्यक्रमामध्ये युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी तसेच सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. “योग ही आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गुरुकिल्ली असून निरोगी शिरूर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगाचा संदेश घराघरांत पोहोचवून आरोग्यदायी, तंदुरुस्त आणि सकारात्मक समाज निर्माण करण्याचा संकल्प सर्वांनी एकत्रितपणे करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

