क्राईमताज्या घडामोडी

संविदणे येथे दिवसाढवळ्या घरफोडी; साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास


शिरूर, :सुदर्शन दरेकर
शिरूर तालुक्यातील संविदणे येथे अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या घरफोडी करून सुमारे 8 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 21 जुलै) दुपारी घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत सौ. सविता बाळासाहेब पडवळ (वय 52, रा. संविदणे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी कपाट उघडून त्यामध्ये ठेवलेले सुमारे 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे गंठण, विविध प्रकारची मंगळसूत्रे, सोन्याच्या चेन, पुरुष व महिलांच्या अंगठ्या, तसेच कानातील दागिन्यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत 8 लाख 50 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 679/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(3) व 305 अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत करीत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे संविदणे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *