उद्योगताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

हरे कृष्ण’च्या अखंड नामघोषात शिरूर भक्तिमय; इस्कॉनच्या भव्य श्रीजगन्नाथ रथयात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”


शिरूर : सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज
“हरे कृष्ण, हरे कृष्ण… कृष्ण कृष्ण, हरे हरे… हरे राम, हरे राम… राम राम, हरे हरे…” या अखंड हरिनामाच्या गजराने बुधवारी शिरूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. इस्कॉन शिरूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य श्रीजगन्नाथ रथयात्रेला शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दिव्य रथाचे दर्शन घेत भक्तिभावाने सहभाग नोंदविला.


रथयात्रेदरम्यान हरिनाम संकीर्तन, टाळ-मृदंगाचा निनाद आणि “हरे कृष्ण”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांनी नृत्य, भजन आणि नामस्मरण करत रथयात्रेची शोभा अधिकच वाढविली.
फुलांनी आकर्षक सजविण्यात आलेल्या श्रीजगन्नाथांच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविकांनी भक्तिभावाने रथ ओढण्याचा आनंद घेतला. या सोहळ्यामुळे शिरूरमध्ये भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण झाले.
इस्कॉन शिरूरच्या वतीने रथयात्रेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सोहळा शांततेत, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *