टेक्नॉलॉजीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

वाहतूक कोंडीला अखेर दिलासा! बहुचर्चित पुणे-शिरूर उन्नत महामार्गाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी’


 

गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार शुभारंभ”
शिरूर -सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज )
पुणेकरांसह शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बहुचर्चित पुणे-शिरूर उन्नत महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) मार्फत राबविण्यात येणाऱ्या पुणे-शिरूर उन्नत मार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.


₹७,५१५ कोटींच्या पुणे-शिरूर उन्नत मार्ग प्रकल्पात ५३.४ किमीचा मार्ग, ३५ किमी चार पदरी उन्नत मार्ग, समांतर चार पदरी महामार्ग आणि प्रस्तावित मेट्रो मार्गाचा समावेश असून, प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीसंदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी वाघोली जकात नाका–केसनंद रोड–कटकेवाडी तसेच लोहगाव हद्द–कटकेवाडी या ३० मीटर रुंदीच्या पर्यायी रस्त्यांचे भूसंपादनासह काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृषिमंत्री दत्तामामा भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *