शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून स्व. अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

“मुख्य बाजार व उपबाजार आवारात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण; सहकार, शेतकरी आणि बाजार समित्यांसाठीच्या योगदानाचे स्मरण”
शिरूर, :सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज )
लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, जि. पुणे यांच्या वतीने मुख्य बाजार, शिरूर तसेच उपबाजार आवारात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सहकार चळवळीला दिलेले बळ, शेतकरी हितासाठी केलेले कार्य आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या मोलाच्या योगदानाचे स्मरण केले. बदलत्या काळात बाजार समित्या अधिक सक्षम, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित व्हाव्यात यासाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि केलेले प्रयत्न कायम प्रेरणादायी राहतील, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
बाजार समित्यांच्या प्रगतीसाठी त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि सहकार क्षेत्राविषयीची तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपत शेतकरी, सहकार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थितांनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली

संपादक : सुदर्शन दरेकर
