महाराष्ट्रराजकीयशहर

स्व. अजितदादा पवार यांना शिरूर नगरपरिषदेत विनम्र अभिवादन; कार्यातून प्रेरणा घेण्याचा निर्धार


शिरूर, : सुदर्शन दरेकर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर नगरपरिषदेत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा तसेच सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यांच्या कार्याचे आणि विकासाभिमुख विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाराष्ट्रासह शिरूर शहराच्या विकासासाठी स्व. अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत जनतेचा विश्वास संपादन करत विकासाभिमुख राजकारण करण्याची प्रेरणा मिळत असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद कालेवार, शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, नगरसेवक एजाज बागवान, सुनील जाधव, अभिजीत पाचर्णे, रंजन झांबरे, श्रुतिका झांबरे, संगीता मल्लाव, स्वाती साठे, निलेश गाडेकर, निलेश पवार आयेशा कलीम सय्यद संतोष शितोळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी स्व. अजितदादा पवार यांच्या विकासदृष्टीचा वारसा पुढे नेत सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *