महाराष्ट्रराजकीयशहर

शिरूर नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय; विकास आराखड्यातील महत्त्वाच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी!


शिरूर, प्रतिनिधी :
शिरूर नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शिरूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील विविध आरक्षणांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
सभेत सादर करण्यात आलेल्या विषयानुसार, शिरूर नगरपरिषद हद्दीतील सुमारे १५ एकर शासकीय जमिनीचा पूर्वीचा वापर बदलून मंजूर विकास आराखड्यात नमूद असलेल्या आरक्षणांनुसार त्या जागेवर क्रीडांगण, सार्वजनिक बाग, ग्रंथालय, सांस्कृतिक सभागृह तसेच व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना विविध सार्वजनिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून शहराच्या नियोजित विकासाला चालना मिळणार आहे.


या विशेष सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, उपाध्यक्ष मितेश प्रदीप गादिया, सभापती सुनील जाधव, नगरसेवक एजाज बागवान, डॉ. सुनीता पोटे, स्वाती साठे, आयेशा सय्यद, उमेश शेळके, स्वप्नाली जामदार, भाजप गटनेते नितीन पाचर्णे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. तसेच मुख्याधिकारी प्रितम पाटील आणि नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारीही सभेस उपस्थित होते.
नगरपरिषदेकडून मंजूर करण्यात आलेल्या या निर्णयामुळे भविष्यात शहरात आधुनिक नागरी सुविधा विकसित करण्यास मोठी मदत होणार असून, शिरूरच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *