आरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

इंद्रायणी नदीला पूर; आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, वारकरी-भाविकांना आळंदीत न येण्याचे प्रशासनाचे आवाहन


आळंदी :सुदर्शन दरेकर (चावडीराज न्युज )
आषाढी वारी २०२६ पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे आळंदी शहरात येणे सध्या धोकादायक बनले असून प्रशासनाने सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे.इंद्रायणीला महापूर; आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांना थांबण्याचे आवाहन

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे आणि आळंदीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


Chawadi raj live

संपादक : सुदर्शन दरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *