अजितदादांच्या कार्याचा सन्मान; महाराष्ट्र शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय”

पुणे, शिरूर -सुदर्शन दरेकर
महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार (अजितदादा) यांच्या जयंतीचा सन २०२६ पासून राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे.
हा निर्णय केवळ एका व्यक्तीच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमात समावेश करण्यापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा अधिकृत सन्मान म्हणून पाहिला जात आहे. राज्याच्या विकास प्रक्रियेत अजितदादांनी बजावलेल्या भूमिकेची दखल शासनाने घेतल्याचे या निर्णयातून अधोरेखित होत आहे.
अजितदादांनी आपल्या राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीत कार्यक्षम प्रशासन, विकासाभिमुख निर्णयप्रक्रिया आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका कायम ठेवली. पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, शिक्षण, क्रीडा, ग्रामीण विकास, शेती आणि जनकल्याण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना गती मिळाली असून राज्याच्या प्रगतीचा भक्कम पाया उभारण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
प्रशासनातील निर्णयक्षमता, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि जनतेशी असलेले जवळचे नाते यामुळे अजितदादा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले. त्यामुळेच ते केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर जनतेच्या हक्काचे ‘दादा’ म्हणून ओळखले जातात.
शासनाच्या निर्णयानुसार, यापुढे प्रत्येक वर्षी २२ जुलै रोजी राज्यातील शासकीय कार्यालये आणि संबंधित ठिकाणी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात येणार आहे. त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैली, विकासदृष्टी आणि जनसेवेच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अजितदादांच्या विकासाचा वारसा, लोकसेवेची प्रेरणा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती भावी पिढ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संपादक : सुदर्शन दरेकर

